Visitors: 454333
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन ➤ कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  ➤रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

  Team jeevandeep      17/05/2025      sthanik-batmya    Share


Dinesh Tawade 

कल्याण :  कल्याण शहरातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जुन्या आणि कट्टर कार्यकर्त्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या दिनेश तावडे यांचे आज शुक्रवारी  सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे भगवा तलाव येथे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

दिनेश तावडे यांनी 1974 पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या समाजकारण आणि राजकारणाला प्रारंभ केला. आपल्या कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सामान्य कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी मोठी झेप घेतली. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य, नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता अशी पदही त्यांनी भूषवली. तर आणीबाणीच्या काळातही त्यांनी तितक्याच आत्मियतेने पक्षाचे काम केल्याची आठवण त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी करून दिली. अशा जुन्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या निधनामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सायंकाळी कल्याण पश्चिमेतील लालचौकी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. 

+